तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
  भ.वि.जा.ज.संघटना संचलित,तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री. कैलास शाहुराज साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी संस्थेच्या सचिव श्रीमती छायाताई सरवदे मॅडम,आम संघर्ष टाइम्सचे संपादक मा.श्री.श्रीनिवास शाहुराज साळुंके, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती इगवे मॅडम , माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री जोगदंड सर प्राथमिक शाळेचे निवृत्त शिक्षक श्री.शिवाजी पवार सर इ.मान्यवर उपस्थित होते.
              ध्वजारोहण झाल्यानंतर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट अशी
 भाषणे केली.त्यानंतर शाळेतील शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत व रांगोळी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

त्याप्रसंगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती इगवे मॅडम, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.जोडदंड सर, प्राथमिक शाळेचेशिक्षक श्री.भगत सर,श्री.फाटे सर,श्री.सवणे सर,श्री.संसारे सर,श्री.ताटे सर,,श्रीम.धरणे मॅडम,श्री.कोळी सर,श्री.मोमीन सर,श्री.शेख सर,श्री.रसाळ सर,श्री.काळे सर,श्री.शिंदे सर,श्री.हराळे सर , श्री.भोरे सर 

माध्यमिक शाळेचे शिक्षक श्री.भड सर,श्री.थोरात सर,श्री.शिंदेसर, श्रीमती.राऊत मॅडम, श्रीमती शकिला मॅडम,श्री.जकाते तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शाळेतील कार्यक्रमानंतर प्राथमिक व माध्यमिक च्या सर्व विद्यार्थ्यांची तुळजापूर शहरातून प्रभातफेरी 
काढण्यात आली.प्रभातफेरी नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.                                                                          
त्या वेळची काही क्षणचित्र







Post a Comment

1 Comments