तुळजाभवानी प्राथमिक शाळेचे स्केटिंग स्पर्धेत घवघवीत यश

    


भ.वि.जा.ज.संघटना संचलित,तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर तुळजापूर या शाळेतील इयत्ता सातवी अ ची विद्यार्थीनी कुमारी सोमेश्वरी दत्ता कांबळे हिने धाराशिव येथे झालेल्या 14 वर्षे वयोगटातील स्केटिंग (इनलाइन) स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.तिच्या या यशाबद्दल  भ.वि.जा.ज.संघटनेच्या सह सचिव तसेच तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर तुळजापूर च्या मुख्याध्यापिका श्रीमती इगवे एस.बी, वर्गशिक्षक श्री. मनोजकुमार संसारे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे कौतुक केले व तिचा सत्कार करण्यात आला.



Post a Comment

0 Comments